राज्यात महा टीईटी परीक्षा नोव्हेंबर मध्ये होणार ?
MAHA TET परीक्षा अपडेट
राज्य परीक्षा परिषदेकडून जोरदार तयारी
राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात २३ तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अनुत्तीर्ण उमेदवारांना संधी
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्षकी सेवेत असलेल्या; परंतु टीईटी अनुत्तीर्ण उमेदवारांना Maha Tet टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर टीईटी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु, शिक्षकी पेशातील संबंधित उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यात होणारी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या २३ नोव्हेंबरला राज्यात टीईटी परीक्षा (Maha Tet) घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील पूर्वतयारी सुरू असून, येत्या काही दिवसांमध्ये परीक्षेसंदर्भातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसार राज्यात ऑफलाइन पद्धतीने परीक्षा पार पडणार आहे.