लाडक्या बहिणींच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली
ऑगस्टचा हप्ता गुरुवारपासून (दि. 11 सप्टेंबर) मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत दिली आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत सांगितले की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे."
ऑगस्टचा हप्ता वितरीत करण्यासाठी किती खर्च आला?
राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी 344 कोटी रुपयांचा निधी दिला असून आजपासून हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.