शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा स्तरावरील विविध
समित्यांची माहिती संचालनालयास सादर करण्याचे निर्देश
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण ११२५/प्र.क्र.२५१/२५ एसएम-१/दि.१६/४/२०२५ नुसार शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा स्तरावरील विविध समित्यांची माहिती संकलित करण्याचे अनुषंगाने मा. मंत्री महोदय यांना ऑनलाईन बैठक घ्यावयाची असल्याने मा. मंत्री महोदय यांचे निर्देशानुसार शासन निर्णय दि.१६/४/२०२५ नुसार शाळास्तरावर गठित करण्यात आलेल्या समित्यांची माहिती संकलित करावयाची आहे.
त्यानुसार सोबत जोडलेल्या तक्त्यातील चारही समित्यांची माहिती स्वतंत्रपणे नमूद करावयाची आहे.
सदरची माहिती दि.१७/९/२०२५ पर्यंत संचालनालयास सादर करण्यात यावी.
शिक्षण उपसंचालक (प्राथमिक)प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे
SMC | स्थापना | पुनर्गठन | रचना | कार्य |
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 (Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009) मधील भाग-चार, कलम 21 नुसार, प्रत्येक प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना अनिवार्य असून, तिचे कार्य शालेय प्रशासनात पालकांचा सहभाग सुनिश्चित करणे हे आहे.
❖ शाळा व्यवस्थापन समितीचे महत्वाचे मुद्दे:
1. स्थापना:-
• शाळा सुरू झाल्यानंतर अथवा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला समितीची स्थापना केली जाते.
• समिती ही शाळेतील त्या भागातील स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागावर आधारित असते.
2. पुनर्गठन:-
• समितीचे कार्यकाल सामान्यतः २ वर्षांचे असते.
• कार्यकाळ संपल्यावर पुनर्गठन करण्यात येते किंवा विशेष परिस्थितीत तात्पुरते बदल केले जाऊ शकतात.
3. रचना:-
• समितीत ७ ते १५ सदस्य असतात.
• त्यात बहुसंख्य पालक (75%) असणे बंधनकारक आहे. उर्वरित सदस्यांमध्ये शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, इ. यांचा समावेश असतो.
4. कार्य / जबाबदाऱ्या:-
• शाळेचा विकास आराखडा तयार करणे
• विद्यार्थ्यांची उपस्थिती व गुणवत्तेवर देखरेख ठेवणे
• शाळेच्या खर्चावर देखरेख ठेवणे
• शिक्षकांचे सहकार्य प्राप्त करणे
•ग्रामीण/शहरी भागात समुदायाचे सहकार्य मिळवून शाळेचे कार्य नियमित चालवणे
सभेतील विषय:-
• शालेय गरजा आणि सुविधा
• पोषण आहाराचे व्यवस्थापन
• शिक्षकांची उपस्थिती
• शाळेतील अनुशासन, स्वच्छता
• नवीन विद्यार्थ्यांचे नावनोंदणी
(getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
