R Top

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) Group Resource Center Coordinator ( Cluster Head )



केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा (2025) परीक्षेसाठी

सन 2023 मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांसाठी दुरुस्तीसाठी सुविधा उपलब्ध-




विभागीय मर्यादित केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा 2025 साठी सन 2023 मध्ये आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते कि आवेदनपत्र भरताना आपण दिलेल्या मोबाईल नंबर व मेल आयडीवर आवेदनपत्र दुरुस्ती करण्यासाठी लागणारा युझर आयडी व पासवर्ड पाठविण्यात आला आहे. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात यावी.

सन २०२३ मध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी आवेदनपत्रामध्ये दुरुस्तीसाठीची वेबलिंक

केंद्रप्रमुखांची 2410 पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी

--------------------------------------------------------


































































केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा डिसेंबर मध्ये | 






2410 केंद्र प्रमुखांची पदे भरण्यात येणार 




समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) 
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा - २०२५ करीता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे कडून प्रसिद्धी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे.
केंद्र प्रमुख परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती जाणून घ्या.

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ अधिसूचना

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) यांची समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निवडीव्दारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे डिसेंबर २०२५ मध्ये समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजन करण्यात येत आहे.

पदनाम:- समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख)
वेतन श्रेणी :- एस १५: (४१८००-१३२३००)
पदसंख्या :- २४१०
( या पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. )
( या पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. )


शासन निर्णय दि. ०१/१२/२०२२ नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्हयातील उर्दू माध्यमांच्या शाळांची संख्या विचारात घेवून उर्दू माध्यमासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) ची पदे निश्चित करतांना अंशतः बदल करू शकतात.

शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः-
शासन अधिसूचना दि. १८ जुलै २०२५ मध्ये नमुद केल्याप्रमाणे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेली अर्हता अनिवार्य असेल.

पात्रता:-
• फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
• जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. बी.कॉम. बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल.
• दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.
• मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी निवडीस पात्र राहील.
• वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार, वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पात्र होणे अनिवार्य आहे.




निवड प्रक्रिया :-
• लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
• जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
• भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.

परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दतः-




परीक्षेचे शुल्क :-
१. सर्व संवर्गातील उमेदवारः रु. ९५०/-
२. दिव्यांग उमेदवारः रु. ८५०/-
३. परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
४. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
५. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.

जिल्हा/ परीक्षा केंद्र निवड :-
जिल्हा / परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परीस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा / परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखाद्या जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली तर ते जिल्हा / परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी :-
सर्वसाधारण :-

प्रवेशपत्र :-




परीक्षेस प्रवेश :-



----------------------------------------------------------

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदे 

 50% पदोन्नतीने व 50% मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेने भरण्यात येणार..

प्रस्तावना :
संदर्भ क्र. ७ येथील शासन निर्णयान्वये केंद्रीय प्राथमिक शाळा-केंद्र केंद्र प्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. केंद्र प्रमुख या पदास आता समुह साधन केंद्र समन्वयक असे संबोधण्यात येते. सदर शासन निर्णयात असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, केवळ पदनामात बदल झाला असल्याने केंद्र प्रमुख पदासाठी निश्चित करण्यात आलेली अर्हता व नेमणूकीची कार्यपध्दती समूह साधन केंद्र समन्वयक या पदास जशास तशी लागू राहील. संदर्भ क्र. ६ येथील अधिसूचनेन्वये समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदासाठीची अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. संदर्भ क्र. ८ येथील शासन निर्णयान्वये समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या संवर्गातील पदे दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सूनिश्चित करण्यात आलेली आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मिळून या संवर्गातील ४८६० पदे मंजूर आहेत. या संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.


दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत शासन निर्णय... अधिक माहितीसाठी (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)


समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना बाबत 29/08/2025 शासन निर्णय डाऊनलोड:- (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)


शासन निर्णय:- 
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या संवर्गातील पदे संदर्भ क्र. ६ येथील अधिसूचनेनुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा या मार्गांनी ५०: ५० या प्रमाणात भरावयाची आहेत. या अनुषंगाने सदर पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


२. पदभरतीचे प्रमाण :- 
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) हे पद त्या त्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पद आहे. त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेत मंजूर असलेल्या एकूण पदांपैकी ५० टक्के पदे पदोन्नतीसाठी व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेसाठी उपलब्ध होतील. एखादया जिल्हा परिषदेत मंजूर पद संख्या विषम असल्यास अधिकचे एक पद पदोन्नतीच्या कोटयात उपलब्ध होईल.


३.पदभरतीचे मार्ग:-


अ) पदोन्नती :-


i. समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदावर पदोन्नतीसाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) असे दोन निम्न संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत
ii. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर ६ वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा अशी अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून ज्येष्ठतेनुसार योग्य व्यक्तीची पदोन्नतीने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदावर नियुक्ती करावयाची आहे.
iii. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून सेवाज्येष्ठता ग्राहय धरली जाईल.
iv. काही प्रकरणात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर ६ वर्षे कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वीच मुख्याध्यापक (प्राथमिक) या पदावर पदोन्नती झाली असण्याची शक्यता आहे. अशा प्रकरणात दोन्ही पदांवर केलेल्या सेवेची एकत्रित परिगणना करण्यात यावी.
V. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर उमेदवाराची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झाली असल्यास हा कालावधी देखील ६ वर्षे कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राहय धरण्यात यावा.
vi. सद्यस्थितीत पदोन्नतीत सामाजिक आरक्षण लागू नाही. तथापि, संदर्भ क्र. ४ व ५ येथील तरतूदीनुसार दिव्यांगासाठीचे समांतर आरक्षण लागू आहे. हे आरक्षण निश्चित करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील ५० टक्के पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी.
vii. पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त असलेल्या पदांपैकी ४ टक्के पदे दिव्यांगासाठी आरक्षित करण्यात यावीत. समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदावरील नियुक्तीसाठी संदर्भ क्र. ८ अन्वये दिव्यांगाचे विशिष्ट प्रवर्ग सुनिश्चित करण्यात आले आहेत, ही बाब विचारात घेऊन आरक्षण निश्चिती करण्यात यावी.
viii. दिव्यांग आरक्षणाच्या संदर्भात संदर्भ क्र. ४ व ५ येथील शासन निर्णयातील तरतूदींची कोटेकोर अंमलबजावणी होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
ix. दिव्यांग व्यक्तींच्या प्रमाणपत्राबाबत संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करावी.
Χ. पदोन्नतीबाबतच्या ज्या सर्वसाधारण तरतूदी संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयात नमूद आहेत, त्या सद्यस्थितीत लागू राहतील.


ब) मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा :

1. समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेद्वारे नियुक्तीसाठी प्रशिक्षीत पदवीधर शिक्षक (प्राथमिक) व प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या संवर्गातील उमेदवार पात्र आहेत. तथापि, प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या संवर्गातील उमेदवारांनी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदांवरील नियुक्तीसाठीची आवश्यक अर्हता धारण केली असली पाहीजे.

ii. उपरोक्त दोन्ही संवर्गातील उमेदवारांनी त्या त्या पदावर किमान ६ वर्षे कालावधीची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राहय धरण्यात यावी. पदभरती वर्षाच्या १ जानेवारी रोजी ६ वर्षे कालावधीची सेवा पूर्ण होणे आवश्यक राहील.

iii. मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा ही एक प्रकारची पदोन्नती असल्याने यास सामाजिक आरक्षण लागू राहणार नाही. तथापि, दिव्यांगाचे समांतर आरक्षण लागू असल्याने वर नमूद केल्याप्रमाणे या संदर्भात कार्यवाही करण्यात यावी. हे आरक्षण निश्चित करण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेच्या कोट्यातील ५० टक्के पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी.

iv. संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेला अभ्यासक्रम सदर परिक्षेसाठी लागू राहील.

V. सन २०२३ मध्ये केंद्र प्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, काही कारणास्तव ही परिक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे त्या परिक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल, त्यांना आता आगामी परिक्षेसाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. या उमेदवारांसाठी वय, अर्हता इत्यादी बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारीत करण्यासाठीची सोय उपलब्ध करुन देण्यात येईल.

vi. सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ८ दिवसात कळवावी. प्राप्त झालेली जिल्हानिहाय माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी त्यानंतर ४ दिवसात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडे सोपवावी. या अनुषंगाने आवश्यक ती घोषणा/अधिसूचना महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने तात्काळ निर्गमित करावी. त्याचप्रमाणे शक्य तितक्या लवकर परिक्षेचे आयोजन करावे. परिक्षा कशा प्रकारे घ्यावी याबाबतचा निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने घ्यावा.

vii. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पदांसाठी राज्य स्तरावर एकत्र मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा घेण्यात येणार असली तरी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेच्या सेवेत आहे, त्याच जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) या पदासाठी दावा करु शकेल. त्या उमेदवारास स्वतःच्या जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील पदेच नियुक्तीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे जिल्हानिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर केली जाईल.

उप सचिव, महाराष्ट्र शासन

----------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!