दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत. ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक: २८ ऑगस्ट, २०२५
प्रस्तावना :-
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ३३ नुसार दिव्यांगासाठी शासन सेवेतील पदांची पदसुनिश्चिती करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्रशासनाने दि.४.१.२०२१ च्या अधिसूचनेव्दारे दिव्यांगासाठी सुनिश्चित केलेल्या पदांची यादी करुन सदर यादी केंद्रशासनाच्या www.disablityaffairs.gov.in या संकेतस्थळावर policy/act/rules-notification येथे list of post identification suitable for persons with benchmark disability notified on dated ४.१.२०२१ या शिर्षकाखाली प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये नमुद केल्यानुसार केंद्रशासनाने पदसुनिश्चिती करुन दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित केलेली गट "अ" ते गट "ड" मधील जी पदे राज्यशासनाच्या आस्थापनेवर आहेत, अशा पदांबाबत दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्याचे तसेच केंद्रशासनाने प्रसिध्द केलेल्या यादीतील ज्या पदांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या कामाचे स्वरुप व प्रचलित वेतनश्रेणी राज्य शासन सेवेतील पदांशी समान आहेत, अशा पदांची पदनामे जरी भिन्न असली तरी, राज्य शासन सेवेतील ती पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित राहतील, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. ०२.०२.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या आहेत. सदर शासन निर्णयातील निर्देशास अनुसरुन ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदांचे दिव्यांग प्रवर्ग सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सदर पदे पुढीलप्रमाणे सुनिश्चित करण्यात येत आहेत.
शासन निर्णय:-
ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी या शासन निर्णयान्वये सोबत जोडलेल्या विवरणपत्र-अ येथे दर्शविल्याप्रमाणे दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्यात येत आहेत.
२. सदरहू शासन निर्णय, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांची दि.४.१.२०२१ रोजीची अधिसूचना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि.२.२.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सुचनांनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत. ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक: २८ ऑगस्ट, २०२५ डाऊनलोड करण्यासाठी:-
(getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)






