TET 2019 परिक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ यांच्याकडून दिनांक : २९ ऑगस्ट, २०२५ रोजी मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पत्र.
विषय:- TET 2019 या परिक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत.
TET-२०१९ या परिक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत अवर सचिव यांचे पत्र डाऊनलोड करण्यासाठी: (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
शिक्षक पात्रता परिक्षा -२०१९ मधील गैरप्रकाराच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर, पुणे येथे दाखल असलेल्या गु.र.नं. ५६/२०२१ व ५८/२०२१ या प्रकरणी झालेल्या तपासात ज्या उमेदवारांची नावे आढळून आली आहेत व ज्यांनी सीटीईटी अथवा बी. एड या आधारावर TAIT-२०२२ ही परिक्षा उत्तीर्ण केली आहे व ज्यांनी शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळावी म्हणून मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायनिर्णय पारीत झाले आहेत, अशा उमेदवारांच्या संदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
२. सर्व उमेदवारांच्या बाबतीत स्वतंत्रपणे सायवर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्याकडून चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करुन घेण्यात यावा. नियुक्ती प्राधिकारी यांनी यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करावा. उमेदवारावर गुन्हा नोंदविण्यात आल्याचे अथवा त्यास सह आरोपी केले असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यास त्यास नियुक्ती देण्यात येऊ नये. उमेदवारावर अद्यापि गुन्हा नोंदविण्यात आला नाही अथवा त्यास सह आरोपी करण्यात आले नाही, असा अहवाल प्राप्त झाल्यास या पत्रासोबत जोडलेल्या नमुन्यात Notarized शपथपत्र उमेदवारांने सादर केल्यास त्यास शिक्षण सेवक पदावर नेयुक्ती देण्याबाबतची कार्यवाही नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करावी.


