नवनियुक्त शिक्षकांसाठी समावेशन कार्यक्रम (Induction Program) वेळापत्रक जाहीर
7 दिवसांच्या प्रशिक्षणाला या तारखेपासून सुरुवात...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कडून नवनियुक्त शिक्षकांसाठी समावेशन कार्यक्रम (Induction Program) अंतर्गत प्रशिक्षणाबाबत महत्त्वाची अपडेट्स समोर आली आहे.
नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ०७ दिवस (५० तासांचे) प्रशिक्षण दिनांक २५.१०.२०२५ ते ३१.१०.२०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
हे महत्वाचे बाबी जाणून घ्या:-
• प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार.
• सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे असून सलग ०७ दिवसांचे राहील. प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय राहणार नाही.
• राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील.
प्रशिक्षणार्थ्यांसाठी पुढीलप्रमाणे खर्च होणार:-
1. एकदाच एक नोट पॅड व पेन ३०/-
2. कर्तव्य भोजन १००/-
3. दोन वेळेचा चहा २०/-
4. सुलभक मानधन ५००×३ = १५००/- (प्रती वर्ग ३ सुलभक)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण इयत्ता १ ली ते १२ वी वेळापत्रक
वरील प्रशिक्षणाबाबतचे पीडीएफ डाऊनलोड


