नवनियुक्त शिक्षकांचे सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण दिवाळीत!
प्रेरण कार्यक्रम Induction Programme बाबत SCERT चे आदेश
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे राज्यातील पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षकांचे सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम प्रशिक्षण आयोजन करण्याची जबाबदारी आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० (NEP 2020) मधील मुद्दा क्रमांक 5.15 ते 5.21 नुसार नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रम Induction Programme आयोजित करण्याची तरतुदीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी एकाच वेळी जिल्हास्तरावर ०७ दिवसीय (५० तासांचे) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते.
नवनियुक्त शिक्षक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण आयोजनासाठी शिक्षक संख्या कळविणे बाबत प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक यांचे पत्र डाऊनलोड करण्यासाठी (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
यावर्षी देखील नवनियुक्त शिक्षकांचे सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम प्रशिक्षण दिवाळीत आयोजित करण्यात येणार आहे त्या संदर्भातील तयारी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक माहितीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना दिनांक 03/09/2025 रोजी पत्र पाठवून त्यांचे अधिनिस्त नवनियुक्त शिक्षकांची संख्या मागवली आहे.
यामध्ये 2020-21 ते 2025-26 पर्यंत म्हणजेच एकूण सहा वर्षातील पवित्र पोर्टल मार्फत नवनियुक्त झालेल्या शिक्षकाची संख्येबाबत तात्काळ माहिती मागवली आहे.
पवित्र पोर्टल मार्फत नवनियुक्त झालेल्या शिक्षकांच संख्या
त्यामुळे राज्यात दिवाळीत नवनियुक्त शिक्षण सेवकांचे प्रशिक्षणाचे आयोजन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवनियुक्त शिक्षक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण आयोजनासाठी शिक्षक संख्या कळविणे बाबत प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अकोला यांचे पत्र पत्र डाऊनलोड करण्यासाठी (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
वर्तमानपत्रातील शैक्षणिक बातम्या:- शिक्षण विभागाशी संबंधित शाळा, विद्यार्थी, शिक्षक, व शैक्षणिक घडामोडींबाबतच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करावे: (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)


