Ad

खुशखबर, भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बिएलओ ) आणि केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ

भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार 

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि 

केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ




मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) यांच्या मानधनाबाबत GR(getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)


भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मानधनात वाढ करणे बाबत सामान्य प्रशासन विभाग दिनांक :- १ सप्टेंबर, २०२५

शासन निर्णय :- 
                     भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (Booth Level Officers) प्रतिवर्षी रु.६,०००/- ऐवजी १२,०००/- (रु. बारा हजार फक्त) एवढे सुधारीत मानधन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officers) यांना, त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी (विशेष संक्षिप्त/संक्षिप्त पूनरिक्षण आणि इतर विशेष कार्यक्रम याकरिता) रू. १,०००/- ऐवजी रु. २,०००/- या सुधारीत दराने वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर सुधारित मानधन / वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधनच्या उपरोक्त तरतूदी दिनांक ०१.०९.२०२५ पासून अनुज्ञेय होतील.

४. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च २०१५-निवडणूका, १०३-मतदारांच्या याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण (००) (०१) मतदार याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण, १३ कार्यालयीन खर्च, संगणक संकेतांक २०१५००३२ या लेखाशीर्षाखाली खर्ची घालावा व संबंधित वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.५०७/व्यय-४, दि.०५.०८.२०२५, अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.



मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांच्या मानधनाबाबत GR (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)

शासन निर्णय :-

४. भारत निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisors) यांना प्रतिवर्षी रु.१२,०००/- ऐवजी रु. १८,०००/- (रु. अठरा हजार फक्त) एवढे सुधारित मानधन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर सुधारित मानधन दिनांक ०१ सप्टेंबर, २०२५ पासून लागू होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!