Ad

TAIT 2025 | शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी निकाल विहित नमुन्यात पुन्हा एकदा प्रसिद्ध अपडेट | MAHA TAIT 2025 RESULT UPDATE

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५



"प्रसिध्दी निवेदन"

महाराष्ट्र शासनाच्या पत्र कमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र.९२/टिएनटी-१, दि. २८/०२/२०२५ व मा. आयुक्त (शिक्षण). यांचे जा.क. आस्था-क/प्राथ १०६/टेट-३/वेप/२०२५/११९१, दि. १९/०३/२०२५ रोजीच्या पत्रान्वये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत "शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५" चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दिनांक २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व दिनांक ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्हांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ८ दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण २२८८०८ परीक्षार्थी/ उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण २११३०८ प्रविष्ठ झाले होते.


शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2025 - निकाल गुणयादी



सदर परीक्षेचा निकाल दि. १८/०८/२०२५ रोजी गुणयादी व गुणपत्रक (SCORE LIST & SCORE CARD) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण ६३२० प्रविष्ठ (Appear) वि‌द्यार्थी/उमे‌द्वारांपैकी २७८९ विद्यार्थी/उमे‌द्वारांचा निकाल दि. २५/०८/२०२५ प्रसिध्द करण्यात आला आहे.

तथापि विद्यार्थी/उमे‌द्वारांच्या मागणीनुसार पुनःश्च विहित नमुन्यातील गुणयादी (SCORE LIST) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

आयुक्त

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,


शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2025 - प्रसिद्धी निवेदन डाऊनलोड करण्यासाठी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!