R Top

U-Dise , SARAL Updates


सन 2025-26 च्या (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक) संचमान्यता, स्कूल पोर्टल व स्टुडंट पोर्टल वर मुख्याध्यापक Loging वरुन माहिती अद्ययावत करणेबाबत.


संच मान्यता 2025-26 बाबत PDF डाऊनलोड


सन 2025-26 ची प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक ऑनलाईन संचमान्यता निर्गमित करण्यासाठी इ १ ली ते १० वी व इ. ११ वी ते १२ वी च्या शाळा/वर्ग तुकडयांचे अनुदान प्रकार, माध्यम व व्यवस्थापनाबाबतची माहिती शाळांना स्कूल पोर्टलवर भरुन अद्ययावत करण्याबाबत खालील प्रमाणे सूचना कळविण्यात येत आहे.

१. मुख्याध्यापक School Portel Loging करुन शाळेचे मेडीयम व अनुदान प्रकार निश्चित करुन शाळा Forward करणे.

२. मुख्याध्यापक यांनी student Portal ला जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या, अनुदान प्रकार, माध्यम व व्यवस्थापन प्रकार तपासून संचमान्यतेसाठी Forward करणे.

३. केंद्र प्रमुख यांना Cluster मधील सर्व शाळांची माहिती दिसेल. केंद्रप्रमुख यांनी शाळा निहाय माहिती तपासणे., एखाद्या शाळेची माहिती मध्ये बदल करावयाचा असल्यास तो बदल करुन Cluster च्या शाळांची माहिती गटशिक्षणाधिकारी यांना forward करेल, बदल नसल्यास केंद्रातील शाळा Verify करुन संचमान्यतेसाठी Forward होतील.

४. मुख्याध्यापक Loging ला Fetch बटन असेल त्यावर Click करुन शाळेची संपूर्ण माहिती दिसेल शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी माहिती काळजीपूर्वक पडताळणी करावी. सर्व तपशील बरोबर असल्यास Verify करावे.

५. मुख्याध्यापक यांनी Loging करुन Get School Information Button Click करावे. आलेली माहिती चेक करुनच वर्किंग पोस्टच्या फॉर्मवर जावे. आणि युडायस प्लस मधील माहिती दुरुस्त करावयाची असल्यास माहिती दुरुस्त करावी.

६. सन २०२५-२६ या वर्षाच्या संच मान्यतेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित वर कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती शालार्थ प्रणालीकडून घेतली जाणार आहे. एकपेक्षा अधिक माध्यमाची शाळा असल्यास शिक्षकांच्या नावासमोर माध्यमाची नोंद करावी. तसेच विनाअनुदानित तत्वावर वैयक्तिक मान्यता प्राप्त व कार्यरत असलेल्या प्राथमिक / माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची माहिती भरण्यासाठी शाळास्तरावर संचमान्यता पोर्टलला टॅब मुख्याध्यापक लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
User Manual PDF डाऊनलोड



उपरोक्त बाबतची कार्यवाही दिनांक ०७.११.२०२५ पर्यत पूर्ण करुन घेण्यात यावी. सदरची कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यास शाळांच्या सन २०२५-२६ च्या संच मान्यता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व शिक्षण उपसंचालक यांच्या लॉगीनवर उपलब्ध होणार नाहीत.

सदरची कार्यवाही न केल्याने एखादया शाळेची संचमान्यता उपलब्ध झाली नाहीतर त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी.


शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे
शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे


------------------------------------------

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत विद्यार्थी समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध.

U-DISE New Students Add Facility Start




सन २०२५-२६ या वर्षामध्ये यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वीपर्यंत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी जिल्हास्तरावरून सुरू.

जिल्हा स्तरावरून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते १२वी पर्यंत विद्यार्थी समाविष्ट करण्यासाठी: SO2 फॉर्म

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये नाव, जन्म तारीख, लिंग, इयत्ता, तुकडी यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी: SO3 फॉर्म


राज्य शासनाच्या वतीने केंद्रशासनाकडे इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत समाविष्ट नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती Add करण्याची सुविधा मिळण्याकरिता विनंती करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने आज दि. २९ सप्टेंबर, २०२५ पासून केंद्र शासनाने जिल्हा स्तरावरून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंत विद्यार्थी समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सदरची सुविधा दि. १७ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत जिल्ह्यांचे लॉगिंनमध्ये सुरू असणार आहे, त्यापूर्वी जिल्ह्यातील एक ही विद्यार्थी यु-डायस प्लस प्रणाली बाहेर राहणार नाही, याची खात्री करून घेण्यात यावी. 

यु-डायस प्लस प्रणाली बाबतचे हे पत्र डाऊनलोड 



----------------------------------------------


 संच मान्यता सन २०२५-२६ | Sanch Manyta 2025-26 Update

आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेवूनच संच मान्यता





शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे सन २०२५-२६, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता करणेबाबत महत्वाचे आदेश.

• सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून Saral पोर्टल व U-Dise+ या दोन्ही पोर्टलवरील माहिती वेगवेगळी न भरता ती एकाच पोर्टलला भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार युडायस प्लस पोर्टल वरच विद्यार्थी माहिती पूर्ण करण्यात यावी. संच मान्यतेसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये यु-डायस प्लस वरील माहितीच्या आधारे संच मान्यता करण्यात येणार असल्याचे दिनांक ३०.०५.२०२५ रोजीच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत.


शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे पत्र डाऊनलोड करण्यासाठी


• सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता दिनांक ३०, सप्टेंबर २०२५ अखेरची पटावरील नोंद झालेल्या पैकी आधार वैध विद्यार्थी संख्या विचारात घेवून संच मान्यता करण्यात येणार आहेत. दिनांक ३०.०९. २०२५ नंतर आधार वैध झालेले विद्यार्थी संख्या व नव्याने नोंदणी झालेली विद्यार्थी संख्या संच मान्यता अथवा संच मान्यता दुरुस्तीसाठी ग्राहय धरण्यात येणार नाही

• सन २०२५-२६ या वर्षाची संच मान्यता करताना ३० सप्टेंबर २०२५ अखेरची पटावरील नोंद विचारात घेताना विद्यार्थी वयानुरुप वर्गात प्रवेश घेतलेला असेल याची खात्री करण्याचे निर्देश प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

• शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) व गटशिक्षणाधिकारी यांनी संच मान्यतेच्या अनुषंगाने पटावरील विद्यार्थी नोंदी आधार वैध पडताळणीचे कामकाज दिनांक ३०, सप्टेंबर २०२५ अखेर किंवा दिनांक ३०.०९.२०२५ च्या तत्पुर्वी पूर्ण करण्याचे व अधिकचा कालावधी देता येणार नाही याची दक्षता घ्यावी ही बाब आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या निदर्शनास तातडीने आणून देण्याची सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

शिक्षण संचालक प्राथमिक,
शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक



या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सरल पोर्टल, यु-डायस बाबतची माहिती दिली आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर ती आपल्या सहकाऱ्यांपर्यंत व मित्र-मैत्रिणींना देखील नक्की शेअर करा.


शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा.
Telegram Channel


धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!