महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ प्रमाणपत्र वितरणाबाबत प्रसिद्धीपत्रक
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - २०२४
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ परीक्षेचे आयोजन दि. १०/११/२०२४ रोजी करण्यात आले होते. या परीक्षेतील पेपर क्र. । (इ. १ ली ते इ. ५ वी स्तर) व पेपर क्र. । (इ. ६ वी ते इ. ८ वी स्तर) चा अंतिम निकाल दि. १४/०२/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आलेला आहे.
सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद / शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयाकडे हस्तपोहोच देण्यात येत आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक ०१/०९/२०२५ ते ०८/०९/२०२५ या कालावधीत केले जाणार आहे. पात्रता धारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मंबई (उ/द/प) यांचे कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे.
आयुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
MAHATET- 2024 प्रमाणपत्र वितरणाबाबत प्रसिद्धीपत्रक PDF डाऊनलोड करण्यासाठी
प्रमाणपत्राचे वितरण खालील सूचना प्रमाणे करावे.
१. उमेदवारांनी खालील कागदपत्रे व प्रमाणपत्रे यांच्या प्रती घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित रहाणे आवश्यक आहे.
अ) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत.
ब) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत.
क) डी.टी.एड उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक
ड) आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र.
इ) दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.
फ) माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा.
ग) ओळखपत्र (आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्राइव्हिंग लाईसन्स, निवडणूक ओळखपत्र इ.)
२. प्रमाणपत्र वितरणाची पेपर निहाय नोंद वही ठेवावी. (त्याची एक प्रत या कार्यालयास द्यावी)
३. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ परीक्षा दि. १०/११/२०२४ चे पात्रता प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराला वितरित करताना प्रमाणपत्राच्या मागील पृष्ठावर संबंधित विद्यार्थ्याने शिक्षणाधिकारी (प्राथ.)/शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे समक्ष स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यानुसार स्वाक्षरी घेऊन व संबंधितांच्या प्रमाणपत्राची खात्री करुन शिक्षणाधिकारी (प्राथ.)/ शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांनी प्रमाणपत्र वितरीत करावे.
४. पात्र परीक्षार्थीना शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचेमार्फत प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचेकडे लेखी तक्रार नोंदवावी. अर्जासोबत पुरावा दर्शक कागदपत्रे (गुणपत्रक, प्रमाणपत्र) जोडावेत. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांनी सदर तक्रारींचा शहनिशा करुन स्वः अभिप्रायासह सदर तक्रारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे त्वरीत पाठवाव्यात.
आयुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
Sir C Set Kab Tak Aaenga
उत्तर द्याहटवा