महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 | MAHA TET EXAM 2025
शिक्षक पात्रता परीक्षा 2025 परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ?महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना वाचून अचूकपणे माहिती भरावी त्या करिता www.mahatet.in या संकेत स्थळावर जावे.
Maha TET परीक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी:- (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचनाः-
खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना वाचून अचूकपणे माहिती भरावी त्या करिता www.mahatet.in या संकेत स्थळावर जावे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचनाः-
खाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.
१. पोर्टल, नवीन नोंदणी करा (नवीन यूजर तयार करणे)
२. ऑनलाईन नोंदणी.
३. आवेदनपत्र भरणे.
४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.
५. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे.
६. आवेदन पत्राची प्रिंट घेणे.
१. ऑनलाईन नोंदणी:-
अर्ज भरण्याविषयीच्या सूचना www.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०२५ उपक्रम मधील लॉगीन या बटणावर क्लिक करून 'उमेदवाराची नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील अर्ज भरण्याविषयीच्या सूचना काळजीपूर्वक वाचून पानाच्या शेवटी असलेल्या मी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ साठी अर्ज भरू इच्छितो /इच्छिते. या पर्यायासमोरील चेक बॉक्स सिलेक्ट करा, नोंदणी फॉर्म भरण्यासाठी नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा.
नवीन यूजर तयार करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे:
अर्जदाराचे प्रथम युजर नेम / पासवर्ड / पासवर्ड पुष्टीकरण / पहिले नाव / मधले नाव / आडनाव / मोबईल क्रमांक / ई-मेल आयडी.
वरील माहिती अचूक भरून झाल्यावर "ओ.टी.पी. पाठवा" या बटनावर क्लिक करा.
नोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांकावरती ओ.टी.पी. पाठवण्यात आला आहे तो ओ.टी.पी. टाकून नोंदणी करा / Submit Registration या Tab क्लिक करा, त्या नंतर नवीन यूजर तयार होईल.
नोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांकावरती ओ.टी.पी. पाठवण्यात आला आहे तो ओ.टी.पी. टाकून नोंदणी करा / Submit Registration या Tab क्लिक करा, त्या नंतर नवीन यूजर तयार होईल.
२. उमेदवाराचे लॉगिन:-
Maha TET Update Today | Maha e e t 2025 application form date
www.mahatet.in या संकेतस्थळाच्या लॉगिन या Tab वर क्लिक करा. उमेदवार लॉगिन ला निवडा. आपण तयार केलेला यूजरनेम आणि पासवर्ड व कॅपचा कोड भरून "लॉगिन" या बटनावर क्लिक करा. पासवर्ड विसरला असल्यास "यूजरनेम किंवा पासवर्ड विसरलात?" या पर्यायाचा वापर करा.
आवेदनपत्र भरणे:
आपण तयार केलेला यूजरनेम आणि पासवर्ड द्वारे "लॉगिन" करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर जा, "लॉगिन" केल्यानंतर आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.
1) वैयक्तिक माहिती:-
• एस.एस.सी. प्रमाणपत्राप्रमाणे उमेदवाराचे पहिलेनाव/मधलेनाव / आडनाव / आईचे नाव भरा आणि जर नावात कोणता बदल असेल तर "YES" निवडा अथवा "No" हा पर्याय निवडा व बदलेल्या नावाची माहिती दया.
•जन्म दिनांक अचूकपणे निवडा.
•आधार क्रमांक दिलेल्या चौकटीत भरावा.
•अर्जदार पुरुष, स्त्री अथवा ट्रान्सजेन्डर आहे हे अचूकपणे निवडा.
•जातीचा प्रवर्ग ड्रॉपडाऊन लिस्ट मधून अचूकपणे निवडणे आणि जात प्रमानपत्राचा क्रमांक व जात प्रमानपत्राचा दिनांक अचूकपणे भरणे.
•सर्व माहिती भरल्यानंतर SAVE & NEXT या टॅबवर क्लिक करणे.
॥) अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती:-
सर्व्हे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, शहराचे / गावाचे पोस्ट (असल्यास) ठिकाण टाईप करावे. जिल्ह्याचे ड्रॉपडाऊन लिस्ट मधून अचूकपणे जिल्हा निवडणे व तालुक्याच्या रकाण्यात अचूकपणे तालुक्याची माहिती भरणे, राज्याच्या ड्रॉपडाऊन लिस्ट मधून अचूकपणे राज्य निवडणे आणि पिनकोड च्या रकण्यात अचूकपणे पिनकोड भरणे.
III) शैक्षणिक माहिती:
A) शैक्षणिक अर्हता:-
शैक्षणिक पात्रता या मुद्यामध्ये पेपर १ (कनिष्ठ प्राथमिक स्तर) या साठी एस.एस.सी. पात्रतेविषयी माहिती भरावी तसेच एच.एस.सी.ची, पदवी, पदव्युतर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती कोर्स, बोर्ड / विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, टक्केवारी / श्रेणी व शततमक / श्रेणी याबाबत अचूकपणे नोंद करावी.
पेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) या साठी एस.एस. सी. आणि पदवीची पात्रतेविषयी माहिती भरावी, तसेच एच.एस.सी. पदव्युतर पदवी आणि इतरशैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती, कोर्स, बोर्ड / विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्तगुण, एकूण गुण, टक्केवारी / श्रेणी व शततमक / श्रेणी याबबात अचूकपणे नोंदकरावी.
B) व्यावसायिक शैक्षणिक अर्हता:-
व्यावसायिक पात्रता मध्ये शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) अथवा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदवी / पदविकेचे नाव, विद्यापीठ / परीक्षा मंडळ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी, शततमक / श्रेणी अचूकपणे नोंदवा.
अर्जदार शिक्षणशास्त्र पदवी किंवा शिक्षणशास्त्र पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्हींची माहिती अचूकपणे नोंदवा. पदव्युतर शिक्षणशास्त्र पदवी (असल्यास) त्याविषयीची माहिती नोंदवा.
IV) परीक्षेसंदर्भातील माहिती:-
•उमेदवार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे, तो जिल्हा ड्रॉपडाऊन लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
•ज्या वर्गासाठी (स्तरासाठी) शिक्षक पात्रता परीक्षा द्यावयाची आहे ते ड्रॉपडाऊन लिस्ट मधून अचूकपणे निवडा. इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर १) आणि इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसण्यास इच्छुक असल्यास "BOTH" दोन्ही साठी हा पर्याय निवडा. (दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
•उमेदवाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल.
•द्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. तसेच प्रथम भाषा (उर्दू/बंगाली/गुजराती/तेलगु/सिंधी/कन्नडा/हिंदी) निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.
•उर्दू माध्यम निवडले असल्यास, दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (NON-LANGUAGE SECTION) उर्दू आणि इंग्रजी भाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील.
•जर मराठी / इंग्रजी किंवा इतर माध्यम (जर की कन्नडा, तेलगु, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली) निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (NON-LANGUAGE SECTION) मराठी आणि इंग्रजी भाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील.
•उमेदवार दिव्यांग असल्यास 'होय' अथवा नसल्यास 'नाही' हा पर्याय निवडा. होय पर्यायावर क्लिक केल्यास दिव्यांगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र क्रमांक, लेखनिक हवा की नाही याची माहिती अचूकपणे नोंदवा (दिव्यांग व्यक्तींना लेखनिक पुरविण्याबाबत तसेच अनुग्रह कालावधीबाबत अनुज्ञेयता मार्गदर्शक सूचना WWW.MAHATET.IN या संकेतस्थळावर तपासून पहाव्यात.
•उमेदवार स्वताः माजी सैनिक असल्यास 'YES' हा पर्याय निवडा, अन्यथा 'NO' हा पर्याय निवडा.
•उमेदवार शहीद सैनिकाची पत्नी किंवा मुलगा/मुलगी असल्यास 'YES' हा पर्याय निवडा, अन्यथा 'NO' हा पर्याय निवडा.
•या पूर्वी महा-टेट परीक्षेसाठी अर्ज केला असल्यास 'YES' हा पर्याय निवडा, अन्यथा 'NO' हा पर्याय निवडा.
•उमेदवार यापूर्वीच्या परीक्षांमध्ये कुठल्या गैरप्रकारात समाविष्ट असल्यास 'YES' हा पर्याय निवडा, अन्यथा 'NO' हा पर्याय निवडा.
•उमेदवाराला जुळा भाऊ किंवा बहीण असल्यास 'YES' हा पर्याय निवडा, अन्यथा 'NO' हा पर्याय निवडा.
•उमेदवाराने ओळखपत्राचा प्रकार ड्रॉपडाऊन लिस्ट मधून अचूकपणे निवडा.
•ओळखपत्र क्रमांक दिलेल्या रकाण्यात अचूकपणे भरावा.
•सर्व माहिती अचूकपणे भरल्यानंतर SAVE & NEXT या टॅबवर क्लिक करावे.
V) दस्तऐवज आपलोड माहिती:-
•हमीपत्र (Self-Declaration) हे उमेदवाराने दिलेला मजकूर A4 साईजच्या कोऱ्या पेपरवर स्वहस्ताक्षरात लिहून, त्याखाली आपली सही व आपला डाव्या हाताचा अंगठा उमटवणे अनिवार्य आहे. त्याची स्वहस्ताक्षरीत प्रत .jpg फॉरमॅटमध्ये 17 kb 500 kb या फाइल साईजमध्ये तयार करावे. त्यानंतर 'Self-Declaration Upload' या टॅबवर क्लिक करून ती फाइल अपलोड करावी.
•उमेदवाराने आपले छायाचित्र (Photograph) .jpg फॉरमॅटमध्ये, 17 kb ते 51 kb या फाइल साईजमध्ये तयार करून अपलोड करावे
•उमेदवाराने आपली स्वाक्षरी (Signature) .jpg फॉरमॅटमध्ये, 17kb ते 51kb या फाइल साईजमध्ये तयार करून अपलोड करावी.
•उमेदवाराने आपला ओळख पुरावा (Identity Proof) PDF फॉरमॅटमध्ये, 30kb ते 500kb या फाइल साईजमध्ये तयार करून अपलोड करावा.
•उमेदवाराने वैयक्तिक माहिती भरतांना नावात बदल असल्यास, 'YES' हा पर्याय निवडलेला असेल तर अशा परिस्थितीत उमेदवाराने नावात बदल झाल्याचे प्रमाणपत्र (Name Change Certificate).jpg फॉरमॅटमध्ये, 17kb ते 500kb या फाईल साईजमध्ये तयार करून अपलोड करणे आवश्यक आहे.
•उमेदवाराने दिव्यांगत्वाची माहिती भरतांना उमेदवार दिव्यांग आहे का यात 'YES' हा पर्याय निवडलेला असेल तर अशा परिस्थितीत उमेदवाराने दिव्यांग प्रमाणपत्र (Certificate of Disability).pdf फॉरमॅटमध्ये, 30 kb ते 500kb या फाईल साईजमध्ये तयार करून अपलोड करणे आवश्यक आहे.
•उमेदवाराने माजी सैनिकाची माहिती भरतांना 'YES' हा पर्याय निवडलेला असेल तर अशा परिस्थितीत उमेदवाराने माजी सैनिक प्रमाणपत्र / Ex-Serviceman Certificate pdf फॉरमॅटमध्ये, 30kb ते 500kb या फाईल साईजमध्ये तयार करून अपलोड करणे आवश्यक आहे.
•उमेदवाराने जर शहीद सैनिकाची पत्नी किंवा कुटुंबीय असल्यास त्यात "YES" हा पर्याय निवडलेला तर अशा परिस्थितीत उमेदवाराने माजी सैनिकाचे प्रमाणपत्र / Ex-Serviceman Certificate.pdf फॉरमॅटमध्ये, 30kb ते 500kb या फाईल साईजमध्ये तयार करून अपलोड करणे आवश्यक आहे.
•सर्व फाइल्स अपलोड केल्यानंतर 'SHOW PREVIEW' या टॅबवर क्लिक करून भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची पडताळणी करा. माहिती अचूक असल्यास 'Proceed to Payment' या टॅबवर क्लिक करून पुढील पानावर परीक्षा शुल्क भरा या टॅबवर क्लिक करा. दिलेल्या मोडपैकी (Credit Card, Internet Banking, UPI, QR Code) आपल्या सोयीस्कर मोडची निवड करून परीक्षा शुल्क भरावे. पेमेंट अडकले असल्यास 48 ते 72 तास प्रतीक्षा करावी.
•पेमेंट यशस्वी झाल्यानंतर उमेदवाराला पावती प्राप्त होईल. ती डाउनलोड करावी.
•उमेदवाराने भरलेला अर्ज डाउनलोड करावा व त्याची प्रत जतन करून ठेवावी.
TET exam 2025 Maharashtra syllabus | TET exam 2025 Maharashtra official website | mahatet.in 2025 | TET exam 2025 Maharashtra notification | शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका | Maha Tet PYP | MAHA TET PREVIOUS YEAR PAPERS






















