उर्दू माध्यमाच्या उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना
(TAIT २०२२ Phase २ Urdu Medium Conversion Round)
२. शासन पत्र दिनांक १४/०३/२०२४ अन्वये सदर जाहिरातीतील सामाजिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या प्रवर्गातील बिंदू अनारक्षित समजून खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारातून भरण्यात यावेत. या तरतुदी विचारात घेऊन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ फेज २ मधील मुलाखतीशिवाय या प्रकाराच्या रिक्त राहिलेल्या पदांबाबत रूपांरित फेरीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार वर नमूद केल्याप्रमाणे यापूर्वी गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त राहिलेली पदे खुल्या प्रवर्गात रूपांतरित केल्यानंतर या रिक्त पदांसाठी उर्दू माध्यमाच्या पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात येत आहे.
३. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पदे वगळून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित फेरीतून भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
४. सध्या पदभरतीसाठी उपलब्ध असलेल्या आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदांचा तपशील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद करताना संबंधित व्यवस्थापनांची मूळ जाहिरात त्यानंतर विविध फेरीमध्ये शिफारस करण्यात आलेली पदे व त्यानंतर सद्य:स्थितीत पदभरतीसाठी उपलब्ध असलेली रिक्त पदे विचारात घेऊन प्राधान्यक्रम नोंद करावेत.
५. उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी पोर्टलवरील दिनांक ०१/०९/२०२३, ०५/०२/२०२४ व वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचनांचे अवलोकन करून प्राधान्यक्रम लॉक करावेत.
६. उमेदवारांना त्यांचे लॉगिनवर प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी दिनांक ०७/१०/२०२५ ते दिनांक ०९/१०/२०२५ या कालावधीत सुविधा देण्यात येत आहे. जे उमेदवार प्राधान्यक्रम विहित मुदतीत लॉक करणार नाहीत, असे उमेदवार उर्दू माध्यमातील उर्वरित रिक्त पदांसाठी विचारात घेतले जाणार नाही.
७. प्राधान्यक्रम Generate करणे, lock करणे इत्यादींबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना edupavitra2022@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधता येईल.

