राज्यातील जिल्हा परिषद / महानगरपालिका/खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत...शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक दि. ०१ ऑक्टोबर, २०२५
शासन परिपत्रक :-
राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत व माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना आवाहन करण्यात येत आहे.
२. राज्यातील सर्व शाळांमध्ये (इयत्ता १ ली ते १२ वी) शाळेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा "माजी विद्यार्थी संघ" स्थापन करण्यात यावा. यासाठी पुढील मार्गदर्शक तत्त्वे व कार्यसूची निश्चित करण्यात यावी.
माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत शासन परिपत्रक डाऊनलोड
शाळेची भूमिका :-
अ) प्रत्येक शाळेने आपल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा संघ त्वरित स्थापन करावा.
ब) प्रत्येक शाळेने माजी विद्यार्थी संघातील सदस्यांची नोंदणी शासनाने पुरविलेल्या ऑनलाईन प्रणालीवर करावी.
क) शाळांनी त्यांच्या आणि माजी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार आणि परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन, माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, स्नेहसंमेलन आपल्या शाळेत आयोजित करावयाचे आहे. यासंदर्भात शाळांनी किमान १५ दिवस अगोदर आपल्या माजी विद्यार्थी संघातील सदस्यांना मेळावा, स्नेहसंमेलन आयोजनाबाबत पूर्वसूचना द्यावी, जेणेकरून माजी विद्यार्थ्यांना मेळावा, स्नेहसंमेलनात सहभागासाठी पुरेसा वेळ मिळेल.
ख) प्रत्येक शाळेने माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनासाठी आवश्यक सुविधा (स्टेज, माईक, स्पीकर, खुर्चा आदि) उपलब्ध करून द्याव्यात.
ग) प्रत्येक शाळेने आयोजित केलेल्या मेळावा, स्नेहसंमेलनाची छायाचित्रे व चित्रफिती शासनाने पुरविलेल्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड कराव्यात.
माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत शासन परिपत्रक डाऊनलोड





