शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीचा निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अखेर TAIT 2025 परीक्षेचा निकाल दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2025 - गुणपत्रक डाऊनलोड वेबलिंक
(getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2025 - निकाल गुणयादी
(getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
राज्यभरातून या परीक्षेस एकूण २२८८०८ परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण २११३०८ प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेसाठी बी.एड. परीक्षेचे १५७५६ Appear व डी.एल.एड. परीक्षेचे १३४२ Appear असे एकूण १७०९८ विदयार्थी/उमेद्वारांनी Appear म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते. यापैकी दिनांक १४/०८/२०२५ अखेर बी.एड. परीक्षेचे ९९५२ व डी.एल.एड. परीक्षेचे ८२७ असे एकूण १०७७९ Appear उमेदवारांची माहिती परीक्षा परिषदेकडे प्राप्त झाली आहे या सर्व उमेदवारांचा निकाल उद्या प्रसिध्द करण्यात येणार आहे.
मात्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल १ महिना कालावधीत त्यांची माहिती परीक्षा परिषदेला सादर ना करणारे बी.एड. परीक्षेचे ५८०४ व डी.एल.एड. परीक्षेचे ५१५ अशा एकूण ६३१९ Appear विद्यार्थ्यांचा उमेद्वारांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विदयार्थी यांची राहिल तद्नंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे देखील परीक्षा परिषदेचे वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८/०८/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
TET 2019 परिक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत आदेश; अधिक माहितीसाठी
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2025 - निकाल गुणयादी



