TAIT परीक्षेतील 6320 उमेदवारांचा निकाल राखीव !
TAIT 2025 परीक्षेचे गुणपत्रक (Score Card ) डाऊनलोड करण्याची अंतिम मुदत दिनांक 31/08/2025 पर्यंतच असल्याने सर्व उमेदवारांनी विहित मुदतीत Score Card ची प्रिंट काढून जतन करून ठेवावी. मुदतीनंतर Score Card डाऊनलोड करण्याबाबत कोणतीही तक्रार अथवा विनंतीचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी. 6320 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे अशा उमेदवारांनी बी.एड. किंवा डी.एल.एड. उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकवर विहित मुदतीत पाठवावेत. विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.


