पवित्र पोर्टलद्वारे निवड शिक्षकांचे यु.आय.डी. दुरुस्ती सुविधा
विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे लॉगीनवर उपलब्ध...
पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र व आधार कार्डमधील नावामध्ये नोंदीची तफावत दुरुस्त करण्यासाठी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे लॉगीनवर सुविधा देण्यात आली आहे. याबाबत पोर्टलवर दि.०९.०९.२०२५ रोजी सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
Pavitra प्रणालीद्वारे व्यवस्थापनाकडे रुजू झालेल्या उमेदवारांच्या शालार्थ आयडी / वेतनाच्या कार्यवाहीबाबत सूचना प्रत डाऊनलोड
वेळोवेळी ऑनलाईन बैठकांमध्ये देखील आपल्या लॉगीनवर UID Error या कारणास्तव प्राप्त झालेल्या प्रकरणी उमेदवारांच्या नावाच्या बाबतीत कागदपत्रांची पडताळणी करुन योग्य असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत आधार कार्डवर असलेल्या नावाची नोंद पवित्र पोर्टलवर घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तरी, आपल्या अधिनस्त शैक्षणिक संस्थांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या उमेदवारांचे नावामध्ये बदल (विवाह नंतरचे नाव बदल) किंवा चुकीचे नाव नमूद केल्यामुळे UID Error आलेल्या उमेदवारांची नावे पोर्टलवर आपल्या लॉगीनमध्ये उपलब्ध आहेत. सदर उमेदवारांचे आवश्यक दस्तऐवज तपासणी करुन संबंधित पुरावा पोर्टलवर Upload करुन आपल्यास्तरावरुन UID Error च्या त्रुटी दूर करण्यात याव्यात.
शिक्षण सहसंचालक
(प्रशासन, अंदाज व नियोजन )
शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, पुणे.

