समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५
शुद्धीपत्रक
दिनांक : १५/१०/२०२५
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिनांक २९/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेमधील मुद्दा क्र. (४) पात्रतेमधील
४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल.
४.३ दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.
ऐवजी असे वाचावे..
४.२ जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./बी.कॉम. बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
४.३ शासन निर्णय दिनांक २९/०८/२०२५ नुसार मुद्दा क्र. (३) मधील ब) ii) अन्वये दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल.
स्थळप्रतीवर मा. आयुक्त यांची स्वाक्षरी असे.
वरील शुद्धीपत्रक PDF डाऊनलोड

