समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) 50% रिक्त पदे भरण्यासाठी
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा लवकरच ?
शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदांकडून मागितला रिक्त पदांचा तपशील!
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदभरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना बाबत GR दि. २९/०८/२०२५ डाऊनलोड करण्यासाठी: (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)
केंद्रप्रमुखांबाबतचा शासन निर्णय दि.२९-८-२०२५ नुसार केंद्रप्रमुखांची 50% रिक्त पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेव्दारे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. याकरिता शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय पुणे यांनी दिनांक-१०/९/२०२५ रोजी सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना पत्र पाठवून समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या संवर्गातील रिक्त पदांचा तपशील मागितला आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
❖दि. २९-८-२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्व्ये केंद्रप्रमुख भरतीबाबत मार्गदर्शनात्मक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
❖समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख) या संवर्गातील पदांसाठी ग्राम विकास विभागाची अधिसूचना दि. १८/७/२०२५ मध्ये अर्हता व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे.
❖त्यानुसार पदोन्नती व मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा या मार्गांनी ५०:५० या प्रमाणात भरावयाची आहेत.
❖ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय दि.२८/८/२०२५ अन्वये समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख या संवर्गातील पदे दिव्यांगाच्या विशिष्ट प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्यात आलेली आहेत.
❖शासन निर्णय दि.२९-८-२०२५ रोजीच्या शासन निर्णयातील ३ (ब) (vi) नुसार सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनेवरील मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षेच्या कोटयातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना तात्काळ कळविणेबाबतचे निर्देश नमूद करण्यात आलेले आहेत.
❖म्हणून शिक्षण संचालकांनी सदरची माहिती संकलित करून महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद यांना सादर करावयाची असल्याने केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांबाबतची माहिती संचालनालयास सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल दर्शविणारे विवरणपत्र
यामध्ये जिल्हानिहाय केंद्रप्रमुखांची मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे शासन निर्णय २९-८-२०२५ नुसार विभागीय स्पर्धा परिक्षेव्दारे पदभरती करिता उपलब्ध पदे (दि.२९/८/२०२५ रोजीची स्थिती) तसेच उर्दू माध्यमाची पदे, दिव्यांग व्यक्तीसाठी प्रकारनिहाय भरावयाची पदे १. अंध/अल्पदृष्टी २. कर्णबधीर ३. अस्थीव्यंग ही माहिती मागवली गेली आहे.
शिक्षण संचालक (प्राथमिक)प्राथमिक शिक्षण संचालनालय, महा. रा. पुणे
आता केंद्रप्रमुख नव्हे तर 'समूह साधन केंद्र समन्वयक' केंद्रीय प्राथमिक शाळा-केंद्र-केंद्रप्रमुख' या व्यवस्थेची पुनर्रचना !
समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) पदे 50% पदोन्नतीने व 50% मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेने भरण्यात येणार..
(getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)