शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी- TAIT - 2025 नुसार शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक बिंदूनामावली तपासणीचे शिक्षण आयुक्तांचे आदेश
❖ २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार मंजूर, कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन विषय व आरक्षणनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याचे निर्देश...
❖ राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा, अध्यक्ष/सचिव, खाजगी शैक्षणिक संस्था यांना सूचना...
❖ पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदुनामावलीच्या तपासणीचे आदेश...
रज्यातील शिक्षक पदभरतीसाठी माहे मे-जून, २०२५ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल दिनांक १८/०८/२०२५ रोजी प्रसिद्ध झाला आहे. या परीक्षेतील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुलाखतीशिवाय या निवडीचा पर्याय निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांची मुलाखतीशिवाय या प्रकारात तर ज्या शैक्षणिक संस्था मुलाखतीसह निवड प्रक्रिया असा पर्याय निवडतील त्या व्यवस्थाथापनांकरीता मुलखतीसह निवड प्रक्रिया अशा पद्धतीने दोन निवड प्रकारात पदभरतीची गुणवत्तेनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पदभरती सन २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार मंजूर, कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन करावयाची आहे. त्यासाठी विषय व आरक्षणनिहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे.
शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक बिंदूनामावली तपासणीचे शिक्षण आयुक्तांचे आदेश डाऊनलोड
यापूर्वी संदर्भाधीन पत्रान्वये मागील पदभरतीच्या वेळी बिंदुनामावली तपासणी करण्याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच मागील पदभरतीच्या टप्पा-२ मध्ये सन २०२४-२५ च्या संच मान्यतेनुसार रिक्त पदे विचारात घेऊन कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते. त्यामुळे मागील सूचनांप्रमाणे शासन निर्णय दिनांक २७/०२/२०२४ नंतर बिंदुनामावली तपासलेली असेल तर पुन्हा बिंदुनामावली तपासण्याची आवश्यकता नाही. तथापि, ज्या व्यवस्थापनांनी शासन निर्णय दिनांक २७/०२/२०२४ नंतर बिंदुनामावली तपासलेली नसेल तर ती तपासून शिक्षक पदभरतीसाठी तयार राहणे आवश्यक आहे.
तसेच आदिवासीबहुल संबंधित ८ जिल्ह्यातील (नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली) सुधारित आरक्षण व बिंदुनामावली विहित करण्याबाबत शासन निर्णय दि.२९/०७/२०२५ निर्गमित झाला आहे. या सर्व व प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदुनामावली तपसून घेण्यात यावी.
बिंदुनामावलीबाबत तक्रारी प्राप्त असल्यास तक्रारीची शहानिशा करूनच पदभरतीची कार्यवाही करण्यात यावी.
कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये, यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे बिंदुनामावलीबाबत प्रचलित तरतुदी विचारात घेऊन बिंदुनामावलीची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी.
अशी कार्यवाही करत असताना कार्यरत कर्मचा-यांचा नियुक्तीचा प्रवर्ग योग्य असल्याची खात्री जबाबदार अधिकाऱ्यांनी करावी. कामाचा अनुभव असलेले कर्मचारी अन्य विभागात कार्यरत असतील तर अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी या कामी घेण्यात याव्यात. तसेच अनुभवी सेवानिवृत्त कर्मचारी यांचीदेखील आवश्यक तेथे सहायता घ्यावी. शासन निर्णय दिनांक ०५/११/२००९ मधील तरतुदीनुसार खाजगी शाळांच्या बाबतीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / (माध्यमिक) यांची प्रथम तपासणी अधिकारी म्हणून वेळीच संस्थांच्या बिंदुनामावलीची तपासणी करून देण्यात यावी.
विभागीय शिक्षण उपसंचालक/शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / (माध्यमिक) यांच्या कार्यालयस्तरावर बिंदुनामावली तपासणी व पवित्र पोर्टलवरील कार्यवाहीसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार स्थापन केलेल्या विशेष कक्षाकडून कार्यवाही करण्यात यावा. सदर कक्षामध्ये अनुभवी कर्मचारी, तसेच अन्य राजपत्रित अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा.
पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती देण्याची सुविधा दिल्यानंतर बिंदुनामावली न तपासण्याची करणे सयुक्तिक होणार नाही. यासाठी पदे रिक्त असलेल्या सर्व व्यवस्थापनांनी गट, विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तसेच बिंदुनामावली तपासल्यानंतर कोणत्या प्रवर्गाची किती रिक्त पदे आहेत इत्यादीबाबतच्या माहितीची पूर्वतयारी करून घ्यावी. यामुळे जाहिरातीसाठी जास्त कालावधी द्यावा लागणार नाही.
आपल्या अधिनस्त शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांची पदभरती वेळेत पूर्ण होण्यासाठी वरीलप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची कृपया दक्षता घ्यावी.
आयुक्त (शिक्षण) म.रा.पुणे-१
महत्वाची सूचना...
TAIT 2025 परीक्षेचे गुणपत्रक (SCORE CARD) डाऊनलोड करण्याची अंतिम मुदत दिनांक 30/09/2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे तरी सर्व उमेदवारांनी विहित मुद्दतीत SCORE CARD ची प्रिंट काढून जतन करून ठेवी मुदतीनंतर SCORE CARD डाउनलोड करण्याबाबत कोणतीही तक्रार अथवा विनंतीचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2025 - गुणपत्रक डाऊनलोड वेबलिंक
(getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
(getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी निकाल 2025 बाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा:
(getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
राखीव निकाल असणारे उमेदवारांनी पुढे काय करायचं? जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा:
(getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2025 - D.El.Ed. & B.Ed. राखीव निकाल जाहीर.. गुण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा:
(getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
(getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 बाबतची माहिती दिली आहे. ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर ती आपल्या सहकाऱ्यांपर्यंत व मित्र-मैत्रिणींना देखील नक्की शेअर करा.
शैक्षणिक अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला आजच जॉईन व्हा.
धन्यवाद!

