8वा वेतन आयोग: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी!
8व्या वेतन आयोगाबाबत सरकारने सभागृहात दिली ही माहिती
"आठवा केंद्रीय वेतन आयोग" बाबत राज्यसभेत मंगळवार, २९ जुलै, २०२५ रोजी खासदार सौ. सागरिका घोष यांचा प्रश्न.
(अ) आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (सीपीसी) स्थापनेस मान्यता देणारी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्याची तारीख ?
(ब) आठव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची निवड झाली आहे का? असल्यास, त्यांची नावे, पदनामे व नियुक्तीचे आदेश सादर करावेत. नसल्यास, त्यांची निवड होण्याचा अंदाजे कालावधी नमूद करावा.
(क) आठव्या आयोगासाठी (सीपीसी) नेमण्यात आलेल्या कार्यसूचीत (ToR) आयोगाने शिफारसी सादर करण्यासाठी कोणती विशिष्ट मुदत निश्चित केली आहे का? असल्यास, ती माहिती द्यावी. नसल्यास, त्यामागील कारणे काय आहेत?
वरील तिन्ही प्रश्नांना राज्य मंत्री, वित्त मंत्रालय श्री पंकज चौधरी यांचे उत्तर:
(अ) सरकारने आठवा केंद्रीय वेतन आयोग (सीपीसी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रमुख भागधारकांकडून मते/ सूचना मागवण्यात आले आहेत. अधिकृत अधिसूचना योग्य वेळी काढण्यात येईल.
(ब) सरकारकडून आठव्या सीपीसीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक केली जाईल.
(क) संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि राज्यांसह प्रमुख भागधारकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. आयोगाला दिलेल्या कार्यसूचीत नमूद केलेल्या कालमर्यादेत शिफारसी सादर करण्याची अपेक्षा आहे.
वरील प्रश्न उत्तर डाऊनलोड करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.