तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था (TOFEI) मार्गदर्शक तत्वाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी संवेदनशीलता (एक दिवसीय) कार्यशाळेचे आयोजन.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने 'तंबाखूमुक्त पिढी: शाळांसाठी आव्हान' या उपक्रमांतर्गत Tobacco Free Generation: School Challenge and Tobacco Free Institutions (ToFEI) शी संबंधित मार्गदर्शक तत्वांची माहिती व अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय अधिकारी, विविध शैक्षणिक संस्था व संबंधित कार्यालयासाठी एक दिवसाची सर्वसमावेशक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत तंबाखूमुक्त शाळांची निर्मिती, विद्यार्थ्यांत जनजागृती, पोस्टर्स व स्पर्धा यासंबंधीचे मुद्दे समाविष्ट केले जाणार आहेत. एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी ९.३० ते ६.०० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बाबत पत्र:-
१. DIET प्राचार्य किंवा त्यांचे नामनिर्देशित अधिकारी.
२. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किंवा त्यांचे नामनिर्देशित अधिकारी.
३. जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालयातील जिल्हा नोडल अधिकारी (TOFEI).
४. जिल्हा आरोग्य विभागातील NTCP अंतर्गत जिल्हा नोडल अधिकारी. उपरोक्त प्रमाणे सर्व अधिकारी कार्यशाळेसाठी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी.
मार्गदर्शक सुचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिकृत डाऊनलोड

