राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी, हिंदी भाषा परीक्षा
राज्य शासनाच्या सेवेतील, आखिल भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना व राज्य शासनाच्या सेवेतील राजपत्रित अधिकारी तसेच अराजपत्रित कर्मचाऱ्यांना मराठी भाषा परीक्षा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. या परीक्षा पुर्वी एतदर्थ मंडळाच्या वतीने ( आता भाषा संचालनालयाच्या वतीने ) शासन सेवेतील अमराठी भाषिक राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा परीक्षा, हिंदी भाषा परीक्षा व इंग्रजी लघुलेखक, इंग्रजी लघुटंकलेखक, इंग्रजी लिपिक टंकलेखक यांच्याकरिता मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा आयोजित करण्यात येतात.
भाषा संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट कोणाला? जाणून घ्या संपूर्ण माहिती- (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
भाषा संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट कोणाला? जाणून घ्या संपूर्ण माहिती- (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
दिनांक १९ जून, २०२५ शासन निर्णयानुसार मराठी भाषा परीक्षा, हिंदी भाषा परीक्षा, मराठी टंकलेखन परीक्षा व मराठी लघुलेखन या सर्व परीक्षा भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येत आहेत. तसेच सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे, अभ्यासक्रम निश्चित करणे, उमेदवाराकडून अर्ज मागविणे, अर्जाची छाननी करणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांची छपाई करणे, गुण देण्याची कार्यपध्दती, निकाल जाहीर करून परीक्षार्थी उमेदवारांच्या कार्यालयांना कळविणे इत्यादी परीक्षांच्या नियोजनासदर्भातील सर्व बाबींची जबाबदारी "भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य" यांच्यावर देण्यात आली आहे.