समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT २) च्या आयोजनाबाबत दि. २४/०९/०२५ रोजीचे SCERT चे पत्र
SCERT चे दि. २३/०९/२०२५ रोजीचे पत्रान्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित चाचणी -१ चे आयोजन दि. १० ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात येत आहे.
समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT २) च्या आयोजनाबाबत दि. २३/०९/२०२५ रोजीची अपडेट पाहण्यासाठी
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी एकूण दहा माध्यमात घेण्यात येणार असून संकलित चाचणी १ करीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचणी पत्रिका राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत पुरविण्यात येत आहेत.
इयत्ता २ री ते ८ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
अश्या सूचना सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व), विभागीय विद्याप्राधिकरण (सर्व), प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व), शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य. व योजना) जि.प. (सर्व), शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई, मनपा, शिक्षण निरीक्षक, मुंबई (उत्तर, दक्षिण, पश्चिम), प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न. प. (सर्व) यांना दिल्या आहेत.
भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-१ बाबत PDF डाऊनलोड (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)



