समग्र शिक्षा प्रकल्प अंतर्गत सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT २) च्या आयोजनाबाबत
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सन २०२५ २६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी- १ व संकलित मूल्यमापन चाचणी -२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येत आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दि.१० ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत करण्यात येत आहे.
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
PAT मधील संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT २) च्या आयोजनाबाबत PDF डाऊनलोड
प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.
संकलित मूल्यमापन - १ चाचणी उद्देश/उपयोग/फायदे :-
नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT) कालावधी
संकलित मूल्यमापन चाचणी - १ चे माध्यम व विषय
संकलित चाचणी- १ चा अभ्यासक्रम :
संकलित मूल्यमापन चाचणी-१ चे वेळापत्रक (कालावधी दि.१० ते १३ ऑक्टोबर २०२५ )









