महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बुलढाणा व सांगली यांना पत्र
पंचायती राज समितीचा रायगड, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बुलढाणा व सांगली जिल्हा परिषदेला भेट व बैठकीचा कार्यक्रम
शाळांकडून अपेक्षित माहिती !
पंचायत समितिला कोणत्या मुद्द्यंवर माहिती द्यावी लागेल? जानन घ्या!
◾सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४, २०२४ मार्च, २०२५ मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी नियमानुसार किती शाळांना भेटी देऊन तपासणी करणे आवश्यक होते, प्रत्यक्षात त्यांनी किती शाळांना भेटी दिल्या व किती शाळांची तपासणी केली, उक्त तपासणींमध्ये कोणते दोष व त्रुटी आढळून आल्या व त्यांचे निराकरणं कशाप्रकारे करण्यात आले ?
◾ सन २०२० ते २०२५ या कालावधीत जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली 'झालेल्या पटपडताळणीमध्ये पंचायत समिती क्षेत्रामधील किती शाळांची पटपडताळणी करण्यात आली आहे, त्यामध्ये एकूण किती विद्यार्थी बोगस असल्याचे आढळून आले आहे ?
शाळा व्यवस्थापन समिती संदर्भात कोणती माहिती द्यावी लागेल?
◾ जिल्ह्यात पंचायत समिती निहाय किती ग्रामपंचायतींमध्ये शाळा व्यवस्थापन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत, सदरहू ग्रामशिक्षण समित्यांच्या बैठकी नियमित घेण्याबाबत शासनांचे आदेश काय आहेत ?
◾ पंचायत समिती निहाय किती ग्रामपंचायतींमधील शाळा व्यवस्थापन समित्यांनी बैठकी घेतल्याचे आढळून आले, बैठकी घेतल्या नसल्यास, या संदर्भात संबंधित ग्रामपंचायतींकडे विचारणा करण्यात आली आहे काय व त्यानुसार या प्रकरणी संबंधितांविरुध्द काय कारवाई करण्यात आली ?
◾ सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४, २०२४ मार्च, २०२५ या अहवाल वर्षी शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद शाळांतील शैक्षणिक दर्जा उंचाविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी चर्चा सत्र आयोजित केले होते काय व असल्यास केव्हा, त्याची फलश्रुती काय आहे ? ग्रामशिक्षण समितीच्या सभा दरमहा होतात काय? तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही करण्यात आली आहे ?
◾उक्त शाळा व्यवस्थापन समितीने मार्च, २०२५ अखेर गेल्या तीन वर्षात कोणकोणत्या कामासाठी निविदा मागविल्या आहेत? त्यानुसार केलेल्या खरेदीचा तपशिल देण्यात यावा.
◾ पंचायत समितीमध्ये मार्च, २०२५ अखेरपर्यंत निवृत्ती वेतनाची किती प्रकरणे केव्हापासून प्रलंबित आहेत व ती प्रलंबित असण्याची कारणे काय आहेत, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे?
शालेय पोषण आहार विषयक कोणती माहिती द्यावी लागेल ?
◽सदर पूरक पोषण आहारामध्ये खंड पडलेला होता काय, खंड पडलेल्या कालावधीमध्ये
अ) पंचायत समिती क्षेत्रातील शालेय पोषण आहार, तसेच पूरक पोषण आहार योजना राबविली जाते काय ?
(ब) असल्यास, कोणकोणत्या शाळांना कोणकोणत्या महिन्यांत किती प्रमाणात शालेय पोषण आहार वितरीत करण्यात आला, याची विगतवारी द्यावी.
(क) शालेय पोषण आहार योजनांतर्गत पुरविण्यात आलेल्या पदार्थांची तपासणी करण्यात येते काय, असल्यास कोणामार्फत, त्यात कोणकोणत्या त्रुटी आढळून आल्या ?
(ड) (१) सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४, २०२४ मार्च, २०२५ या वर्षात प्रकल्पनिहाय पूरक पोषण आहारासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या किती ?
(२) त्यापैकी किती लाभार्थ्यांना वर्षभरात (किमान ३०० दिवस) आहार वाटप करण्यात आला आहे ?


