R Top

TAIT परीक्षेच्या निकाल राखीव असलेले ३१८७ उमेदवारांना शेवटची संधी | या मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही

 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2025

प्रसिद्धी निवेदन

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT ) २०२५ परीक्षेच्या

 निकालामधील ३१८७ उमेदवारांचा राखीव निकालाबाबत 

महत्वाची सूचना


अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT ) २०२५ परीक्षेच्या निकालामधील ३१८७ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे अशा उमेदवारांनी बी.एड. किंवा डी.एल.एड. उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक https://www.mscepune.in/dtedola/TAIT2025InfoAppear.aspx या लिंकवर विहित मुदतीत (१५/०९/२०२५ पर्यंत) पाठवावेत. विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

TAIT परीक्षेचा निकाल दि. १८/०८/२०२५ रोजी गुणयादी व गुणपत्रक (SCORE LIST & SCORE CARD) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण ६३२० प्रविष्ठ (Appear) विद्यार्थी/उमेद्वारांपैकी २७८९ विद्यार्थी/उमेद्वारांचा निकाल दि. २५/०८/२०२५ प्रसिध्द करण्यात आला आहे. तद्नंतर दि. ०३/०९/२०२५ रोजी ३४४ विद्यार्थी/उमे‌द्वारांचा निकाल प्रसिध्द करण्यात आला आहे.


TAIT-2025 - प्रसिद्धी निवेदन PDF डाऊनलोड (getButton) #text=(DOWNLOAD) #icon=(download) #color=(#f51183)


राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण ६३२० प्रविष्ठ (Appear) वि‌द्यार्थी/उमे‌द्वारांपैकी एकूण ३१८७ प्रविष्ठ (Appear) विद्यार्थी/उमेदवारांनी २ मे २०२५ अन्वये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या दिलेल्या संकेतस्थळावरील लिंक‌द्वारे अ‌द्यापही माहिती न भरल्याने अशा ३१८७विद्यार्थी/उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात अलेला आहे. या‌द्वारे पुनःश्च आवाहन करण्यात येते कि, दि १५/०९/२०२५ पर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या लिंक मध्ये माहिती व अंतिम वर्षास प्रविष्ट उत्तीर्ण असलेबाबतचा निकाल देण्यात यावा. दि १५/०९/२०२५ नंतर माहिती सादर करणाऱ्या विद्यार्थी/उमेदवारांच्या राखीव निकालाबाबत विचार केला जाणार नाही. याची सर्व विद्यार्थी/उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.

TAIT 2025 मधील B.Ed. & D.El.Ed. Appear उमेदवारांसाठी गुणपत्रक सादर करणेसाठीची वेबलिंक (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!