केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, २०२५
जिल्हानिहाय निवड यादी तयार करणे व नियुक्ती प्रक्रिया राबविणे
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ च्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची प्रक्रिया चालू झाली आहे. प्रस्तावांतर्गत निवड प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण झाल्यास जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील सुमारे २४०० पदे या शिक्षक पदभरतीसाठी उपलब्ध होऊ शकतात. शिवाय आगामी शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु होत असल्याची पार्श्वभूमी व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आलेल्या वाढीव जबाबदाऱ्या विचारात घेता देखील उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत निवड व नियुक्ती प्रक्रिया संपन्न होईल, याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.




