PM-POSHAN योजनेअंतर्गत अन्न व विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करावयाच्या मानक SOP
शासन परिपत्रक :-
१) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यामध्ये राबविण्यात येते. सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना सकस, पौष्टिक, रुचकर तसेच, चांगल्या दर्जाचा पोषण आहाराचा लाभ मिळणे आवश्यक आहे. सबब, सदर योजनेंतर्गत अन्न विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करावयाच्या मानक कार्यपध्दती (SOP-Standard Operating Procedure) सोबत जोडलेल्या परिशिष्ट प्रमाणे राहतील.
२) उपरोक्तप्रमाणे मानक कार्यपध्दतींचे सर्व संबंधितामार्फत काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच, सदर योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय /परिपत्रक / मार्गदर्शक सूचना / निर्देश यांचे सुध्दा तंतोतंत पालन करण्यात यावे.