जिल्हा परिषद जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करावे:
शा.पो.आ. संदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करावे:
Pavitra प्रणालीद्वारे व्यवस्थापनाकडे रुजू झालेल्या
उमेदवारांच्या शालार्थ आयडी / वेतनाच्या कार्यवाहीबाबत सूचना
उमेदवारांसाठी सूचना
मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनाकडे शिफारस केलेल्या तसेच मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांनी मुलाखतीच्या तपशीलाची नोंद केल्यानंतर निवड केलेल्या आणि नियुक्ती आदेशानुसार विहित मुदतीत रुजू झालेल्या उमेदवारांच्या शालार्थ आयडी / वेतनाच्या कार्यवाहीबाबत सूचना.
वरील सूचना PDF डाऊनलोड करण्यासाठी
1. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (दुसरा टप्पा) नुसार पवित्र पोर्टल मार्फत पदभरतीकरिता मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनासाठी उमेदवारांची शिफारस यादी दिनांक 21/05/2025 रोजी तसेच मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनासाठी उमेदवारांची मुलाखतीसाठी दिनांक 25/06/2025 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
2. व्यवस्थापनाच्या नियुक्ती आदेशानुसार संबंधित उमेदवार शाळेत रुजू होण्याबाबतचा तपशील नोंद करण्याची सुविधा शाळा/मुख्याध्यापक यांचे लॉगीन वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
3. मुख्याध्यापकांनी लॉगीन केल्यानंतर Applicant Joining Details या मेनुंतर्गत व्यवस्थापनाने शाळेत नियुक्ती दिलेल्या सर्व उमेदवारांची यादी दिसेल. त्यातील उमेदवाराचे नाव निवडून त्याचा रुजू अहवालाबाबतची माहिती नोंद करणे आवश्यक आहे.
4. शासन निर्णय दिनांक 07/02//2019 मधील मुद्दा क्रमांक 5.18 नुसार व्यवस्थापनांनी नियुक्ती केल्यानंतर व असे उमेदवार रुजू झाल्यानंतर या नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता घेण्याची आवश्यकता नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मुख्याध्यापक यांच्या लॉगीनवरून उमेदवारांची शालार्थविषयक माहिती भरल्यानंतर संबंधित शिक्षकांचा ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीमार्फत जनरेट होत आहे. सदरची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे, त्यामुळे शालार्थ आयडी साठी उमेदवारांस कोणत्याही यंत्रणेकडे संपर्क साधण्याची आवश्यकता नाही.
तथापि, ज्या उमेदवारांच्या स्व-प्रमाणपत्रामधील आणि आधार कार्डमधील नावाच्या नोंदींमध्ये तफावत असेल व त्यामुळे UID Error येत असेल अशा उमेदवारांच्या बाबतीत संबंधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून नावांतील नोंदीची तफावत दुरुस्त करून घ्यावी. संबंधित विभागीय उपसंचालक यांच्या लॉगीनवर नावातील योग्य ती नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी उमेदवारांनी मुख्याध्यापकाचे पत्र, UID Error येत असल्याची पवित्र पोर्टलवरील प्रिंट, उमेदवाराच्या स्व-प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्डची प्रत, नावात तफावत असल्याचा पुरावा (उदा., विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नाव बदलाबाबतच्या राजपत्राची प्रत इत्यादी) यांसह संबंधित विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयात उपस्थित राहून UID Error बाबतची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी.
शाळा व्यवस्थापन समिती (SMC) संबंधित माहितीसाठी (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)

