पुढील दोन वर्षात TET उत्तीर्ण ना करणाऱ्या शिक्षकांचे काय होईल? SC च्या निर्णयामुळे हजारो शिक्षक प्रभावित होणार!
0Radiance Updateसप्टेंबर १०, २०२५
दोन वर्षात TET उत्तीर्ण ना करणाऱ्या शिक्षकांचे काय होईल?
SC च्या निर्णयामुळे हजारो शिक्षक प्रभावित होणार !
जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर!
सुप्रीम कोर्टाने प्राथमिक व उच्च प्राथमिक म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांबाबत मोठा निर्णय दिला आहे. पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या शिक्षकांनी दोन वर्षांच्या आत टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण करणे बंधनकारक केले आहे, अन्यथा त्यांची नोकरी जाऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय देशातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील शिक्षकांवर लागू होणार आहे. इतकेच नाही तर हा निर्णय शिक्षण हक्क कायदा (RTE) लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षकांवरही लागू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे, त्यांना नोकरीत टिकून राहण्यासाठी पुढील दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण करावी लागेल.
प्रश्न 1: सर्वोच्च न्यायालयाने पहिली ते आठवी या वर्गाला शिकवणारे शिक्षकांविषयी काय निर्णय दिला आहे?
उत्तर: सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना निकालाच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीत टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण करणे अनिवार्य असेल, अन्यथा त्यांची नोकरी जाऊ शकते.
प्रश्न 2: या नियमामुळे राज्यातील किती शिक्षक प्रभावित होतील?
उत्तर: देशातील प्रत्येक राज्यातील आकडेवारी वेगवेगळी असू शकते, महाराष्ट्रातील हजारो शिक्षक यामुळे प्रभावित होतील तसेच उपलब्ध आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात सुमारे 2 लाख आणि मध्य प्रदेशात सुमारे 3 लाख शिक्षक या निर्णयामुळे प्रभावित होतील, ज्यांनी अद्याप टीईटी परीक्षा पास केलेली नाही.
प्रश्न 3: टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी किती वेळ दिला आहे?
उत्तर: ज्या शिक्षकांच्या सेवेला अजून पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे, त्यांना निकालाच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
प्रश्न 4: अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण करणे बंधनकारक असणार का?
उत्तर: सुप्रीम कोर्टाने अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या बाबतीत निर्णय मोठ्या खंडपीठाकडे विचारासाठी पाठवला आहे. मोठ्या खंडपीठाकडे याबाबत निर्णय होईल.
प्रश्न 5: टीईटी उत्तीर्ण न करणाऱ्या शिक्षकांचे काय होईल?
उत्तर: दोन वर्षाच्या कालावधीत टीईटी उत्तीर्ण न केल्यास शिक्षकांना सेवेतून कार्यमुक्त किंवा सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल मात्र त्यांना सेवानिवृत्तीचे सर्व लाभ मिळतील.
प्रश्न 6: पदोन्नतीसाठी देखील टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे का?
उत्तर: होय, पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. ज्यांच्या सेवानिवृत्तीला 5 वर्षांपेक्षा कमी किंवा जास्त कालावधी असेल अश्या दोन्ही प्रकारच्या शिक्षकांना जर पदोन्नती हवी असेल तर टीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल अन्यथा प्रमोशन मिळणार नाही.
प्रश्न 7: सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय का दिला आहे?
उत्तर: विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांची गुणवत्ता सुधारावी यासाठी कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
प्रश्न 8: टीईटी पास करण्यासाठी किती कालावधी देण्यात आला आहे?
उत्तर: ज्या शिक्षकांची सेवा मुदत पाच वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांना टीईटी पास करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.
प्रश्न 9: टीईटी उत्तीर्ण करण्यापासून कोणाला सूट देण्यात आली आहे ?
उत्तर: ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला फक्त पाच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे,( म्हणजेच जे आज 53+ आहेत) अश्या शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या आर्टिकल 142 मधील शक्तींचा वापर करून टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्यापासून सूट दिली आहे, मात्र जर अशा शिक्षकांना पदोन्नती हवी असल्यास त्यांना देखील टीईटी उत्तीर्ण करावी लागणार आहे.